सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे परिमंडळीय सरळसेवा पदभरती 2015

वाहन चालक

सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे परिमंडळीय सरळसेवा पदभरती 2015 अंतर्गत वाहनचालक या रिक्त पदाकरीता लेखापरिक्षा (40 गुण) व व्यावसायिक वाहन चालक क्षमता (50 गुण) पूर्ण करणेत आलेली आहे. या पदभरतीकरीता उर्वरीत वाहनचालक वैद्यकीय चाचणी (10 गुण) अद्याप घेणे बाकी आहे.
सदर वाहन चालक पदाकरीता प्रवेश अर्ज दाखल करुन लेखी परिक्षा साठी उपस्थित असणा-या खालील यादीमध्ये समाविष्ठ पात्र उमेदवांराची वैद्यकीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालय प्रशासनाकडून प्राप्त वेळापत्रकानुसार लेखी परिक्षा दिलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी वेळापत्रक  जाहीर करणेत येत आहेत. या वेळापत्रकानुसार संबधित उमेदवारांनी त्यांच्या दर्शविलेल्या दिनांकास व वेळेत संबधित नमूद शासकीय रुग्णालय येथे वैद्यकीय चाचणी परिक्षा साठी उपस्थित राहणेचे आहे व प्रशासकीय व वैद्यकीय चाचणीसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणेची आहे.

वैद्यकीय चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी

वैद्यकीय चाचणी ठिकाण

 

ससुन सर्वोपचार रुग्णालय पुणे, जयप्रकाश नारायण रोड पुणे रेल्वे स्टेशन जवळ पुणे 411 001

 

1. वैद्यकीय चाचणीसाठी येताना उमेदवारांनी त्यांना सुरु असलेल्या वैद्यकीय उपचार व कागदपत्रे, औषधे, अलर्जी या वैद्यकीय बाबत संपूर्ण माहिती संबधित वैद्यकीय चाचणी घेणा-या वैद्यकीय अधिका-यांना देणेची आहे जेणेकरुन वैद्यकीय चाचणी मध्ये सुलभता येईल.

2. वैद्यकीय चाचणीसाठी उमेदवारांना संबधित शासकीय रुग्णालय येथे जाणे-येणे साठी वा इतर कोणताही प्रवास भत्ता/ उपस्थिती भत्ता निर्वाह भत्ता अनुज्ञेय नाही.

3. वैद्यकीय अधिका-यांची अनिवार्य तातडीची रुग्ण सेवा व आपत्कालीन सेवा यांचा विचार करुन उमेदवारांनी त्याना नेमून दिलेल्या वेळेत व ठिकाणी वैद्यकीय चाचणीसाठी वेळेत उपस्थित राहून विलंब टाळवा व सहकार्य करणेचे आहे

4. उमेदवारांनी वैद्यकीय चाचणीसाठी येताना स्वत:चे दोन आयडेंटीटी आकाराचे रंगीत फोटो व त्याचे फोटोसह असणारे शासकीय ओळखपत्र (पॅन कार्ड/आधारकार्ड /ड्रायव्हींग लायसेन्स इ.) मुळ प्रत पुरावा म्हणून तसेच एक झेरॉक्स चाचणी उपस्थिती अधिका-यांना  सादर करणेसाठी सोबत आणणेचे आहे.

5. वैद्यकीय चाचणीसाठी प्राप्त वेळेचे बंधन व वैद्यकीय अधिका-याची सेवा कालावधी यामुळे वेळापत्रकानुसार या वैद्यकीय चाचणी परिक्षासाठी अनुपस्थित उमेदवारांची पुनश्च चाचणी घेतली जाणार नाही व त्याना या चाचणी करीता अनुपस्थित दर्शवून गुणानुक्रम जाहीर केला जाईल याबाबत उमेदवाराकडून कोणतीही तक्रार/ हरकत, न्यायालयीन / न्यायधिकरण दावा शासनास मान्य होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

6. आपत्कालीन वैद्यकीय व तातडीची रुग्णसेवा, शासकीय अनिवार्य सेवा यामुळे वैद्यकीय चाचणी वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत संबधित उमेदवारांना पुढील तारखा व वेळापत्रक बदल अवगत करण्यात येईल या बाबत कोणतीही तक्रार निवेदन वा न्यायिक दावा शासनास मान्य होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.